
बोरशेती , ता. २९: पालघर तालुक्यातील बोरशेती येथील शिवराम घरत यांच्या घरातील कोंबड्यांच्या खुराड्यात आज (दिनांक -२९ सप्टेंबर)रोजी पहाटे ६:३० सुमारास मोठा अजगर आढळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे सात ते आठ फूट लांबीचा अजगर खुराड्यात दिसून आला.
मंगळवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास अजगर आढळताच घरत यांनी तातडीने गुंदले येथील सर्पमित्र रामू दळवी आणि संतोष पुंजारा यांना माहिती दिली. दोन्ही सर्पमित्रांनी घटनास्थळी दाखल होत काळजीपूर्वक अजगराला पकडून सुरक्षितपणे रेस्क्यू केले.
त्यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगल परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात आले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे अजगराला जीवदान मिळाले.
