Uncategorized

बोईसरमध्ये युवकावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला

लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

बोईसर, ता. २: चित्रालय परिसरातील हॉटेल उत्सवसमोर राहुल यादव या युवकाला १० ते १३ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात राहुल यादव गंभीर जखमी झाला असून, मारहाणीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल उत्सवसमोर युवकावर अचानक टोळक्याने हल्ला केला. हातातील लोखंडी रॉड तसेच लाठ्या-काठ्यांनी त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, खुलेआम झालेल्या या मारहाणीमुळे बोईसर परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *