Uncategorized

नवरंग फाउंडेशन तर्फे बोईसरमध्ये ६ हजार रसिकांसाठी भव्य इंडोर गरबा उत्सव

बोईसर, ता. ४: नवरंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य इंडोर गरबा उत्सवाची माहिती देण्यासाठी रविवारी नवीन बोईसर येथील सरोवर हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन गेल्या वर्षापासून या उत्सवाचे आयोजन करीत असून, यंदा उत्सवाचे स्वरूप अधिक भव्य करण्यात आले आहे.

यंदाच्या उत्सवासाठी गेल्या वर्षी पेक्षा ही आकर्षक गायक, ऑर्केस्ट्रा आणि संगीताची व्यवस्था करण्यात येणार असून, सर्वपक्षीय आमदार, खासदार व विविध पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सुमारे ५ हजार चौरस फुटांच्या मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा मंडपाचा विस्तार करून तब्बल ६ हजार गरबा रसिकांची क्षमता ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे अडचणी निर्माण होऊनही उत्सव सुरळीतपणे पार पडला होता. यंदा मागील वर्षातील अनुभव लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. खाद्यपदार्थांच्या स्टॉलची संख्याही वाढविण्यात आली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक लाख रुपयांची देणगी जमा करण्यात आली होती. यंदाही दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष निलम संखे यांनी सांगितले.

यंदाच्या उत्सवासाठी वन डे पास २१० रुपये, १० दिवसांचा जनरल पास १,५०० रुपये, तर व्हीआयपी पास २,९९९ रुपये ठेवण्यात आला आहे. सुरक्षितता, मोठा मंडप, दर्जेदार कलाकार, ऑर्केस्ट्रा आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल यामुळे यंदाचा गरबा उत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे.

 पत्रकार परिषदेला नवरंग फाउंडेशनचे प्रभाकर राऊल (विश्वस्त), निलम संखे (अध्यक्ष), संजय पाटील (कार्याध्यक्ष), अशोक वडे (कार्यकारी सचिव), सचिन लोखंडे, समीर मोरे व मनोज अधिकारी (उपाध्यक्ष), अल्पेश मोरे (खजिनदार), चंद्रकांत जाधव (सचिव), देवेश देशमुख (सहखजिनदार) यांच्यासह अतुल देसाई, प्रशांत राऊत, प्रशांत संखे , दिनेश वडे, शुभम वडे, बाबा नायगुडे, आशिष ठाकूर, आशिष संखे , गणेश संखे आणि सुनिकेत पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकारिणी जाहीर : बोईसर व पालघर परिसरातील सर्व गरबाप्रेमींनी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवरंग फाउंडेशनतर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *