पालघर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर जिल्हा पोलिस दलातील दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी १५ अधिकारी व अंमलदारांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले. यामध्ये २५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या सात जणांना अति उत्कृष्ट, तर १५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या आठ जणांना उत्कृष्ट सेवा पदक मिळणार आहे.

अति उत्कृष्ट सेवा पदक (२५ वर्षे) मिळविणाऱ्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक रविंद्र सुभाष नाईक, पोलीस निरीक्षक रणवीर प्रकाश बयेस, दत्तात्रेय बाजीराव किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बाबुराव वानखेडे, अनिल पांडुरंग दिघोळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश महादु नवले आणि किरण हरीश्चंद्र अंभीरे यांचा समावेश आहे.
उत्कृष्ट सेवा पदक (१५ वर्षे) मिळविणाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप श्रीपती पाटील, सुनील साहेबराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक विशाल राजेंद्र शिर्के, तसेच पोलीस हवालदार दीपक शांताराम राऊत, सचिन नारायण चौधरी, पराग कमलाकर म्हात्रे, नरेंद्र नाना पाटील आणि दिनेश मावजी गायकवाड यांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पोलिस दलातील दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेत ही पदके प्रदान केली जातात. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी पदकप्राप्त सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
