Uncategorized

पालघर जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

रक्षाबंधन, अनंत चतुर्दशी व धनत्रयोदशीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुट्टी

पालघर, ता. २७ : पालघर जिल्ह्यात सन २०२६ साठी तीन स्थानिक सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. रक्षाबंधन, अनंत चतुर्दशी आणि धनत्रयोदशी या सणांच्या निमित्ताने जिल्ह्यातील शासनाच्या सर्व खात्यांतील कार्यालयांना स्थानिक सुट्टी लागू राहणार आहे.

अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन, २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी आणि ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशी या तिन्ही दिवशी, शुक्रवारी स्थानिक सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने दरवर्षी ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन विशेष महत्त्वाने साजरा केला जातो. मात्र, सन २०२६ मध्ये ९ ऑगस्ट हा दिवस रविवारी आल्याने त्या दिवशी आधीपासूनच शासकीय सुट्टी असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

शासनाने जाहीर केलेल्या नियमित सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त जिल्ह्याच्या प्रमुखास तीन स्थानिक महत्त्वाच्या सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार असल्याने, त्या अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *