
बोईसर, ता. १४ : महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशक्ती सामाजिक संघटना, बोईसर, श्रमिक कामगार संघटना आणि पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (१३ सप्टेंबर) रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे डॉन बॉस्को शाळा , खोदारामबाग बोईसर येथे आयोजन करण्यात आले.

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०३ जणांनी रक्तदान केले, तर १७० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच २७ महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली.

या उपक्रमातून आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, आयोजक, कार्यकर्ते, रक्तदाते आणि स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य केले.

