Uncategorized

डहाणूतील ९० लाखांच्या दरोडा प्रकरणी तिघांना अटक; ५१ लाखांचे सोने जप्त

​डहाणू :डहाणू येथील ईराणी रोडवरील ‘न्यू लक्ष्मी ज्वेलर्स’मध्ये बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ९० लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ​२० जुलै रोजी सायंकाळी तीन बुरखाधारी आरोपींनी दुकानात घुसून मालक विनय सोनी यांच्यावर गोळी […]

​डहाणू :डहाणू येथील ईराणी रोडवरील ‘न्यू लक्ष्मी ज्वेलर्स’मध्ये बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ९० लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

​२० जुलै रोजी सायंकाळी तीन बुरखाधारी आरोपींनी दुकानात घुसून मालक विनय सोनी यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला व तोडफोड करून दागिने लुटून पोबारा केला होता. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​स्थानिक गुन्हे शाखा व डहाणू पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे २७ जुलै रोजी यशवंत चौधरी (४०) याला, तर १३ ऑगस्ट रोजी दिपेश गवळी (२२) आणि विशाल चौरे (२३) यांना अटक केली. आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील वाढीव कलमे लावली असून, उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *