Uncategorized

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने बोईसर-तारापूर मार्ग कोंडीत

रस्त्यालगत हातगाड्या, आईस्क्रीम गाड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा; वाहनांच्या लांबच लांब रांगा

बोईसर, ता. ३ : बोईसर-तारापूर या मुख्य मार्गावर रस्त्यालगत बसणारे फेरीवाले, हातगाड्या तसेच आईस्क्रीमच्या गाड्यांमुळे रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत आहे. त्यामुळे या मार्गावर विशेषतः गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना तासन्‌तास कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विविध खाद्यपदार्थ, फळे आणि इतर वस्तूंच्या हातगाड्या लावल्या जात असल्याने वाहनांसाठी उपलब्ध रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच सायंकाळच्या वेळेत आईस्क्रीमच्या गाड्यांभोवती नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जात आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

वाहतूक पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने रस्त्यालगतच्या अनधिकृत हातगाड्या व अतिक्रमणांवर कारवाई करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *