Uncategorized

मासवण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

निलेश सांबरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व अधीक्षकांचा समावेश

पालघर, ता. १ : मासवण येथील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आदिवासी सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते निलेश सांबरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात संस्थेचे सचिव महेश नाईक, मुख्याध्यापक राहुल संखे, अधीक्षक पांडुरंग लहारे आणि अधीक्षिका अमृता सावंत यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), ३(५) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल चव्हाण यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची तसेच संबंधितांच्या भूमिकेची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, पुढील तपास पालघर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *