Uncategorized

तारापूर एमआयडीसीत सुरू केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीत दुर्घटना; तिघे भाजले

बोईसर, ता. १८: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुरू केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीत N- 72 मध्ये पेट्रोलियम जेली उडून तीन कामगार भाजल्याची घटना गुरुवारी (१३ ऑगस्ट) सकाळी १०. ४५ च्या सुमारास घडली. या घटनेत अनिश रजक (२२) हा सुमारे १० टक्के भाजला असून, त्याला पुढील उपचारांसाठी ठाणे येथील नॅशनल बर्न्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘व्हाईट पेट्रोलियम जेली’ हा कच्चा माल गरम कढईत टाकत असताना अचानक गरम द्रव्य उडाले. यामुळे अनिश रजक याच्यासह आनंद सिंह व रंगदार बाग हे तीन कामगार भाजले. आनंद सिंह व रंगदार बाग यांना किरकोळ दुखापत झाली असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

 औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *