Uncategorized

आमदार तरे यांच्या वाढदिवशी सेवाभावाची ‘भेट’

बोईसर, ता. १९: शिवसेनेचे बोईसर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसर-तारापूरमधील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबोडे, तारापूर येथील सिद्धी सिनियर सिटीजन होम वृद्धाश्रमात अन्नदान व शिधावाटप केले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले.

आमदार तरे यांचा वाढदिवस १९ सप्टेंबर रोजी असून, मोठा उत्सव न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या गरजांची माहिती घेतली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अजय दिवे, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर विचारे, झाकीर साठी, अतुल देसाई, नापेश संखे,  हर्षल पटवार, कुणाल बागुल, सुभाष दुबे, जिलेदार वर्मा यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *