
एडवण : विद्याभवन हायस्कूल, एडवण येथील १९९३-९४ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विराथन येथील एस. किणी रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडला. तब्बल ३२ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. केक कापून आणि चॉकलेट वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येकाने शाळेनंतरची शैक्षणिक, नोकरी-व्यवसायातील तसेच कौटुंबिक वाटचाल एकमेकांशी शेअर केली.
शाळेतील गंमती-जमती, आठवणी आणि जुन्या प्रसंगांना उजाळा देत दिवसभर गप्पा, हास्य-विनोद आणि मस्तीचा आनंद सर्वांनी घेतला. ‘शाळा संपली, पण मैत्री संपली नाही’ याची अनुभूती या स्नेहमेळाव्यातून आली. उपस्थित राहता न आलेल्या मित्र-मैत्रिणींना पुढील स्नेहमेळाव्यात सहभागी करून घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
संतोष जाधव, अनिल राऊत, राकेश मोरे, आशिष वैद्य, योगेश पाटील, निलेश देव, निलेश वैती, वसंत जैन, नितीन वैती, उज्वला वाळींजकर, प्रज्ञा राऊत, मेघा वर्तक, मेघा ठाकूर, शिल्पा किणी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
