Uncategorized

आर. टी. जैन अँड कंपनीच्या परिसरात मध्यरात्री आगीचा भडका; अग्निशमन दलाला प्रवेश नाकारला

आर. टी. जैन अँड कंपनीच्या परिसरात मध्यरात्री आगीचा भडका; अग्निशमन दलाला प्रवेश नाकारला बोईसर , ता. २५ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एफ-१/१९ वरील आर. टी. जैन अँड कंपनीच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीच्या शेडमधून मोठ्या ज्वाळा व धुराचे लोट बाहेर पडल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी […]

आर. टी. जैन अँड कंपनीच्या परिसरात मध्यरात्री आगीचा भडका; अग्निशमन दलाला प्रवेश नाकारला

बोईसर , ता. २५ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एफ-१/१९ वरील आर. टी. जैन अँड कंपनीच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीच्या शेडमधून मोठ्या ज्वाळा व धुराचे लोट बाहेर पडल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कंपनीचे प्रवेशद्वार न उघडल्याने जवानांना परिसरात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला माघारी फिरावे लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कंपनीतील कामगारांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याचे सांगण्यात येते.

कारखान्यात वायर जाळून तांबा वेगळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून, या प्रक्रियेदरम्यान आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मात्र, आग लागल्यानंतरही अग्निशमन दलाला तातडीने प्रवेश का मिळाला नाही, तसेच कारखान्यातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची स्थिती काय होती, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची संबंधित विभागांकडून चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

“कंपनी परिसरात वायर जाळून तांबे काढण्याचा प्रकार सुरू होता. त्यातून आग लागली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली; मात्र कंपनीचे गेट न उघडल्याने आत प्रवेश करता आला नाही. आग लहान स्वरूपाची होती.”

विजय मोटे, अग्निशमन दल अधिकारी, तारापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *