वनविभागाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष
डहाणू : वाणगाव परिसरातील मोगरबाव आणि खेतखाडी भागात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ८.४० वाजता मोगरबाव येथील दर्शन राऊळ यांच्या घराच्या अंगणात बिबट्याने कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना ग्रामस्थांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
