Uncategorized

‘बोईसर नवरंग २०२६’ला सुरुवात; स्थानिक कलाकारांना संधी

बोईसर, ता. ११: नवरंग फाउंडेशनतर्फे सर्कस ग्राउंड येथे ‘बोईसर नवरंग २०२६’ गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात स्थानिक कलाकार आणि व्यावसायिकांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांना कला सादरीकरण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यंदा बिरसा मुंडा मैदानावरील गरबा आयोजनावरून निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर नवरंग फाउंडेशनने सर्कस ग्राउंडवरील आयोजनावर भर दिला आहे. मंडप उभारणी, ध्वनियंत्रणा, आर्केस्ट्रा यांसह विविध व्यवस्थांची जबाबदारी स्थानिक व्यावसायिकांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच स्थानिक गायक आणि कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

गरबाप्रेमींना उत्सवात सहभागी होता यावे, स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा महोत्सवामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे बोईसरमधील नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक वातावरणात भर पडण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *